साताऱ्यातील भीषण अपघातात पुण्यातील तरुण बँक अधिकाऱ्याचा मृत्यू

Dilip KurhadePuneSataraCity19/06/2025642 Views

साताऱ्यातील भीषण अपघातात पुण्यातील तरुण बँक अधिकाऱ्याचा मृत्यू

पुणे :  साताऱ्यात एलपीजी गॅस वाहक टँकरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पुण्यातील उच्चशिक्षित बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तुषार सतीश कांबळे (वय 43 ,रा. अहिल्या सोसायटी येरवडा) यांचा साताऱ्यातील रहमतपूर येथे झालेल्या या दुर्दैवी अपघातात  गुरुवारी (ता. 19) रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी, मेहुणे असा मोठा परिवार आहे.
तुषार कांबळे हे आयडीबीआय बँकेत ऑपरेशन मॅनेजर म्हणून सातारा येथे कार्यरत होते.  गुरुवारी ते कामानिमित्त सकाळी रहमतपूर कडे दुचाकी वरून निघाले होते. समोरून आलेल्या गॅस टँकर ने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारापूर्वीच त्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघात करणाऱ्या टँकर चालका विरुद्ध रहमतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. तुषार कांबळे यांनी MBA फायनान्स मध्ये शिक्षण पूर्ण करून मागील 15 वर्षांपासून IDBI बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांचा नातेवाईक व मित्रपरिवार याचा मोठा जनसपंर्क होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबियासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री येरवडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Recent Comments
No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...